Wakad crime News : अश्लील फोटो पती आणि वडिलांना पाठवण्याची धमकी देऊन विवाहितेवर बलात्कार

आरोपीने फिर्यादी महिलेचे लग्न झालेले असताना तिला पुन्हा लग्नाचे आमिष दाखवले.

-MPC-FIRST-TOP-BANNER-I

एमपीसी न्यूज – विवाहितेचे अश्लील फोटो तिच्या पती आणि वडिलांना पाठवण्याची धमकी देऊन तसेच लग्नाचे आमिष दाखवून एका तरुणाने विवाहितेवर बलात्कार केला. ही घटना जानेवारी 2020 पासून 3 सप्टेंबर 2020 या कालावधीत थेरगाव आणि किवळे येथे घडली. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

राजेश ज्ञानेश्वर पवार (वय 22, रा. मुकाई चौक, किवळे) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी पिडीत विवाहितेने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादी महिलेचे लग्न झालेले असताना तिला पुन्हा लग्नाचे आमिष दाखवले. तसेच विवाहितेचे अश्लील फोटो तिच्या वडील आणि पतीला पाठवण्याची धमकी दिली. तसेच विवाहितेच्या अंगावर अगरबत्तीने चटके देऊन जखमी केले.

आरोपीने थेरगाव येथील बापुजी बुवानगर, एकता कॉलनी आणि मुकाई चौक किवळे येथे विवाहितेला शिवीगाळ करून मारहाण करण्याची धमकी देत तिच्यावर बलात्कार केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.