Wakad Crime News : वेश्या व्यवसायासाठी मुंबईहून आणलेल्या तरुणीची सुटका; तिघांवर गुन्हा दाखल

गरिबीचा गगैरफायदा घेत वेश्या व्यवसायात ढकलले

0

एमपीसी न्यूज – एका तरुणीला वेश्या व्यवसायासाठी मुंबईहून पुण्याला पाठवले. वाकडमधील एका एजंटच्या माध्यमातून पुणे परिसरात वेश्या व्यवसाय करून घेतला. याप्रकरणी एजंटसह तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल करून पोलिसांनी तरुणीची सुटका केली आहे. ही कारवाई मंगळवारी (दि. 6) सायंकाळी वाकड ब्रिजखाली करण्यात आली.

सनिसिंग, आयशा (रा. मुंबई), एजंट मोहम्मद फाजील राईन (रा. मोरेवस्ती, पुणे. सध्या रा. साखरेवाडी, हिंजवडी) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.

_MPC_DIR_MPU_II

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सनीसिंग आणि आयशा या दोघांनी मिळून एका 24 वर्षीय तरुणीला तिच्या गरिबीचा गैरफायदा घेऊन मुंबईहून पुण्याला वेश्या व्यवसायासाठी पाठवले. वाकड येथील एजंट आरोपी मोहम्मद याच्या मदतीने पुणे परिसरात वेश्या व्यवसाय करून घेतला.

आरोपी मोहम्मद हा रिक्षा चालक असून त्याच्या रिक्षातून तो तरुणीला ठिकठिकाणी घेऊन जात असे. याबाबत माहिती मिळाल्यानंतर वाकड पोलिसांनी कारवाई करून तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल करून तरुणीची सुटका केली.

वाकड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Leave a comment