Wakad crime News : नुकसान भरपाई मागितल्याने रिक्षा चालकाला मारहाण

0

एमपीसी न्यूज – एका दुचाकीने रिक्षाला धडक दिली. त्यामुळे रिक्षा चालकाने दुचाकीस्वाराला भरपाई मागितली. यावरून तीन जणांनी मिळून रिक्षा चालकाला बेदम मारहाण केली. ही घटना शनिवारी (दि. 12) रात्री साडेनऊ वाजता डांगे चौक, वाकड येथे घडली.

प्रमोद बाळू खताळ (वय 24, रा. ड्रायव्हर कॉलनी, काळेवाडी फाटा, वाकड) यांनी याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी चेतन साळुंखे आणि त्याचे दोन साथीदार यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डांगे चौक वाकड येथे शनिवारी रात्री साडेनऊ वाजता फिर्यादी खताळ यांच्या रिक्षाला आरोपीच्या दुचाकीने धडक दिली. यात रिक्षाचे नुकसान झाले. त्यामुळे खताळ यांनी आरोपीकडे नुकसान भरपाई मागितली.

यावरून तिन्ही आरोपींनी मिळून खताळ यांना लाकडी बांबूने आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. यात खताळ जखमी झाले. आरोपी शिवीगाळ करून तिथून निघून गेले. याबाबत सोमवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वाकड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.