Wakad Crime News : स्वीगीच्या डिलिव्हरी बॉयला मारहाण

एमपीसी न्यूज – डिलिव्हरी देण्यासाठी गेलेल्या स्वीगीच्या डिलिव्हरी बॉयला दोघांनी बेदम मारहाण केली. तसेच डिलिव्हरी बॉयच्या कुटुंबाला उध्वस्त करण्याची धमकी दिली. ही घटना शनिवारी (दि. 10) रात्री साडेनऊ वाजता स्कायलॅंड सोसायटी, वाकड येथे घडली.

सागर विजय बेले (वय 26, रा. काकडे कॉलनी, हिंजवडी) असे जखमी डिलिव्हरी बॉयचे नाव आहे. याबाबत त्यांनी रविवारी (दि. 11) वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. त्यानुसार अविनाथ नलावडे, सोन्या मोहिते (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे स्वीगीमध्ये डिलिव्हरी बॉयचे काम करतात. शनिवारी रात्री साडेनऊ वाजता फिर्यादी वाकड येथील स्कायलॅंड सोसायटीमध्ये डिलिव्हरी देण्यासाठी गेले.

तिथे आरोपींसोबत त्यांची किरकोळ बाचाबाची झाली. त्यानंतर आरोपींनी फिर्यादी यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करून दगडाने मारले. फिर्यादी यामध्ये जखमी झाले.

‘तू आमच्या नादी लागलास तर तुझी फॅमिली उध्वस्त करेन’ अशी आरोपींनी फिर्यादी डिलिव्हरी बॉयला धमकी दिली. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.