Wakad crime News : तडीपार आरोपीला पिस्टलसह अटक

एमपीसी न्यूज – पुणे जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार केलेल्या आरोपीला वाकड पोलिसांनी पिस्टलसह अटक केली आहे. ही कारवाई बुधवारी (दि. 23) सायंकाळी सव्वासहा वाजता पुनावळे येथे करण्यात आली.

साहिल रामदास कुंभार (वय 22, रा. ओम चौक, बिजलीनगर, चिंचवड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस शिपाई के. एम. पाटील यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी साहिल कुंभार हा चिंचवड पोलिसांच्या रेकोर्डवरील गुन्हेगार आहे. त्याला 5 फेब्रुवारी 2020 रोजी पुणे जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार केले होते. त्याचा तडीपारीचा कालावधी संपण्यापूर्वी तो जिल्ह्याच्या हद्दीत आला.

वाकड पोलिसांना याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी त्याला पुनावळे येथील मंगलधारा सोसायटीच्या समोरील रस्त्यावरून सापळा लावत बुधवारी सायंकाळी ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे एक गावठी पिस्टल आणि एक काडतूस आढळून आले. पोलिसांनी पिस्टल आणि काडतूस जप्त करत त्याला अटक केली.

वाकड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विवेक मुगळीकर, सहायक पोलीस निरीक्षक हरीश माने, पोलीस उपनिरीक्षक प्रवीण चौगुले, सिध्दनाथ बाबर, नितीन ढोरजे, दीपक भोसले, बापूसाहेब धुमाळ, सुरज सुतार प्रशांत गिलबिले, शाम बाबा, कल्पेश पाटील आदींनी कारवाईत सहभाग घेतला.

वाकड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.