Wakad crime News : अल्पवयीन चोरट्याकडून दहा दुचाकी जप्त; वाकड पोलिसांची कारवाई

एमपीसी न्यूज – वाकड पोलिसांच्या रेकोर्डवरील एका अल्पवयीन सराईताला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्याकडून चोरीच्या तब्बल दहा दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. तर त्याच्या एका साथीदाराला देखील पोलिसांनी अटक केली आहे. या कारवाईमुळे भोसरी पोलीस ठाण्यातील घरफोडीच्या गुन्ह्यासह एमआयडीसी भोसरी, वाकड, हिंजवडी, पिंपरी पोलीस ठाण्यातील पाच वाहनचोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत.

प्रकाश हरिदास पाटील (वय 23, रा. कैलासनगर, पिपरी) असे अल्पवयीन सराईताच्या साथीदाराचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाकड परिसरात पेट्रोलिंग करत असताना पोलीस हवालदार बापूसाहेब धुमाळ यांना माहिती मिळाली की, वाकड पोलिसांच्या रेकोर्डवरील अल्पवयीन मुलगा त्यांच्या एका साथीदारासोबत थेरगाव येथील बिर्ला हॉस्पिटलजवळ थांबला आहे. त्यानुसार, पोलिसांनी परिसरात सापळा लाऊन दोघांना ताब्यात घेतले.

पोलिसांनी दोघांकडून तीन लाख रुपये किमतीच्या दहा दुचाकी जप्त केल्या आहेत. या कारवाईमुळे भोसरी पोलीस ठाण्यातील घरफोडीचा एक, वाकड पोलीस ठाण्यातील वाहनचोरीचे दोन, हिंजवडी, पिंपरी आणि एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यातील वाहनचोरीचे प्रत्येकी एक असे एकूण सहा गुन्हे उघडकीस आले आहेत. अन्य पाच दुचाकींच्या मूळ मालकांचा पोलीस शोध घेत आहेत.

ही कारवाई पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त सुधीर हिरेमठ, सहाय्यक पोलीस आयुक्त श्रीधर जाधव, यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक हरिश माने, उपनिरीक्षक सिध्दनाथ बाबर, पोलीस कर्मचारी बापुसाहेब धुमाळ, बाबाजान इनामदार, बिभीषण कन्हेरकर, नितीन ढोरजे, दीपक भोसले, शाम बाबा, सचिन नरोटे प्रशांत गिलबिले, विजय गंभीरे, विक्रम कुदळ, प्रमोद भांडवलकर, जावेद पठाण, विक्रम जगदाळे, सुरज सुतार, नितीन गेंगजे यांच्या पथकाने केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.