Wakad Crime News : मुलगी झाली म्हणून विवाहितेला घरातून हाकलले

0

एमपीसी न्यूज – विवाहितेच्या चारित्र्यावर संशय घेऊन तसेच तिला मुलगी झाली या कारणावरून सासरच्या मंडळींनी विवाहितेचा छळ करुन तिला घरातून हाकलून लावले. याबाबत सासरच्या चार जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अब्दुल इसराईल मन्सुरी (वय 25), जरीना इसराईल मन्सुरी (वय 45), इसराईल मन्सुरी (वय 58), नसरुल्ला इसराईल मन्सुरी (वय 27, सर्व रा. काळेवाडी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत 22 वर्षीय विवाहितेने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

_MPC_DIR_MPU_II

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा प्रकार 28 जून 2017 ते 22 फेब्रुवारी 2021 या कालावधीत काळेवाडी परिसरात घडला आहे. आरोपींनी विवाहितेच्या चारित्र्यावर संशय घेतला. तसेच तिला मुलगी झाली या कारणावरून तिला वारंवार शिवीगाळ व मारहाण केली. गॅरेज टाकण्यासाठी विवाहितेकडून एक लाख 80 हजार रुपये घेतले.

तसेच तिचे सोन्याचे दागिने परत न देता तिला घरातून हाकलून दिले. तिचा शारीरिक व मानसिक छळ केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Leave a comment