_MPC_DIR_MPU_III

Wakad crime News : दगडफेक, तोडफोड करणा-या तथाकथित भाईंची वाकड पोलिसांकडून धिंड

एमपीसी न्यूज – स्वतःला भाई म्हणवून घेत परिसरात कुरापती करणा-यांना वाकड पोलीस चांगलाच इंगा दाखवला. रहाटणी येथे 30 ऑक्टोबर रोजी रात्री दहशत निर्माण करत दगडफेक आणि कोयत्याने तोडफोड केल्याची घटना घडली. त्यातील आरोपींची वाकड पोलिसांनी आज (सोमवारी, दि. 2) पायी फिरवून धिंड काढली.

_MPC_DIR_MPU_IV

शुभम निवृत्ती कवठेकर (वय 23, रा. बिबवेवाडी, पुणे), दीपक नाथा मिसाळ (वय 23), मंगेश मोतीराम सकपाळ (वय 23, दोघेही रा. काळेवाडी), कैलास हरिभाऊ वंजाळी (वय 19), आकाश महादेव कांबळे (वय 22), सनी गौमत गवारे (वय 19, तिघेही रा. रहाटणी) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. तर इतर दोन अल्पवयीन मुलांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले होते.

_MPC_DIR_MPU_II

आरोपींना न्यायलयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या कोठडीचा सोमवारी शेवटचा दिवस होता.

अटक केलेल्या आरोपींना वाकड पोलिसांनी घटनास्थळी नेले. आरोपींना बेड्या ठोकून फटके देत त्यांना गल्लीबोळातून फिरवण्यात आले. असे उपद्रव करणा-यांबाबत नागरिकांमध्ये प्रचंड चीड असते. मात्र नागरिकांना व्यक्त करता येत नाही. वाकड पोलिसांच्या या उपक्रमामुळे नागरिकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.

सहाय्यक पोलीस निरीक्षक वीरेंद्र चव्हाण म्हणाले, “आरोपींनी कुठे तोडफोड केली, याची पाहणी करण्यासाठी आज त्यांना घटनास्थळी नेण्यात आले होते. आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेले दोन कोयते जप्त करण्यात आले आहेत.”

_MPC_DIR_MPU_I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.