Wakad crime News : कोयता बाळगल्याप्रकरणी तिघांना अटक

ही कारवाई 8 सप्टेंबर रोजी दुपारी सव्वापाच वाजता भाग्यवंती मंदिराजवळ कोकणेनगर, काळेवाडी येथे करण्यात आली.

एमपीसी न्यूज – बेकायदेशीररित्या कोयता बाळगल्या प्रकरणी वाकड पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. ही कारवाई 8 सप्टेंबर रोजी दुपारी सव्वापाच वाजता भाग्यवंती मंदिराजवळ कोकणेनगर, काळेवाडी येथे करण्यात आली.

सोन्या उर्फ प्रथमेश यशवंत सावंत (वय 20, रा. कोकणेनगर, काळेवाडी), दीपक भीमराव सगर (वय 20, रा. कोकणेनगर, काळेवाडी), विनायक विनोद श्रीवास (वय 20, रा. थेरगाव) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी दुपारी सव्वा पाच वाजताच्या सुमारास आरोपी त्यांच्याकडे कोयता बाळगून वावरत होते. कोयत्याच्या सहाय्याने ते दहशत माजवत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. ‘

त्यामुळे पोलिसांनी कारवाई करत तिघांना अटक केली. त्यांच्या विरोधात महाराष्ट्र पोलीस अधिनियम 37 (1) (3) सह 135 आर्म ॲक्ट 4 (25) क्रिमिनल लॉ अमेंटमेंट कायदा कलम 7 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.