-MPC-TOP-MOST-BANNER-I

Wakad Crime News : जमिनीच्या वादातून तिघांना मारहाण; सहा जणांवर गुन्हा

-MPC-FIRST-TOP-BANNER-I

एमपीसी न्यूज – जमिनीच्या वादातून सहा जणांनी मिळून तिघांना बेदम मारहाण केली. ही घटना रविवारी (दि. 13) दुपारी आदर्श कॉलनी, वाकड रोड, वाकड येथे घडली.

बाबर चांद शेख (वय 60), सोहेल बाबर शेख (वय 21), बाबर शेखची पत्नी आणि बाबर शेख यांच्या तीन मेहुण्या (सर्व रा. आदर्श कॉलनी, वाकड) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत आशा दिलीप कलाटे (वय 50, रा. ननावरे वस्ती, बाणेर) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी ह्या त्यांच्या शेतीच्या मशागतीचे काम करत होत्या. त्यावेळी जमिनीच्या वादातून आरोपी बाबर शेख आणि त्याचा मुलगा सोहेल शेख यांनी फिर्यादी यांचा मुलगा आणि पतीला सिमेंट ब्लॉकने व बांबूने मारहाण करून जखमी केले.

बाबर शेख, त्याची पत्नी आणि तीन मेहुण्या यांनी फिर्यादी यांचे केस पकडून त्यांना खाली पाडले. तसेच हाताने मारहाण केली. आरोपीच्या एका मेहुणीने फिर्यादी यांच्या मुलाच्या नाकाजवळ, पाठीवर बोचकरून छातीवर चार ठिकाणी चावा घेऊन जखमी केले.

वाकड पोलीस तपास करीत आहेत.

 

.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_POSTEND_MAT_1POST DOWn