Wakad Crime News : वाकड पोलिसांकडून तीन चोरटे जेरबंद; 22 गुन्हे उघड, 15 लाखांचा मुद्देमाल जप्त

एमपीसी न्यूज – वाकड पोलिसांनी दोन कारवाया करत तीन सराईत चोरट्यांना अटक केली. त्यांच्याकडून तब्बल 22 गुन्हे उघडकीस आणले. तसेच 15 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. अटक केलेल्या आरोपींकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

वाकड पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलींग करत असताना पोलीस अंमलदार प्रशांत गिलविले, सुरज सुतार व तात्या शिंदे यांना माहिती मिळाली की, घरफोडीतील दोन सराईत गुन्हेगार ताथवडे येथे निलकमल हॉटेल समोरील रस्त्यावर चोरीच्या उद्देशाने थांबले आहेत.

त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून दिलीप विश्वनाथ काळे (वय 38) व रवि ऊर्फ रोहीत अनिल मारवे (वय 21, दोघे रा. म्हारळगांव, ता. कल्याण, जि. ठाणे) यांना ताब्यात घेतले. त्याच्याकडे सखोल तपास केला असता त्यांनी आणखी एका साथीदारासोबत मिळून केलेल्या घरफोडी आणि वाहनचोरीच्या तब्बल 13 गुन्ह्यांची कबुली दिली.

_MPC_DIR_MPU_II

या चोरट्यांकडून 175 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, दोन दुचाकी, सहा हजार रुपये रोख रक्कम, मोबाईल फोन व गुन्ह्यात वापरलेली एक दुचाकी दुचाकी, असा एकूण 9 लाख 78 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

दुसऱ्या कारवाईत पोलीस अंमलदार बिभीषन कन्हेरकर , नितीन गेंगजे व विक्रम जगदाळे यांना सराईत चोरटा अक्षय अनिल काशीद (वय 24, रा. पवारनगर, थेरगाव) याच्याबद्दल माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी कस्पटेवस्ती येथील ॲम्बीयन्स हॉटेल समोर सापळा रचून अक्षय आला ताब्यात घेतले.

त्याच्याकडून 5 लाख 30 हजार रुपये किमतीच्या चोरीच्या तब्बल 13 दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. तसेच नऊ गुन्हे उघडकीस आले आहेत.

ही कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक विवेक मुगळीकर, पोलीस निरीक्षक (गुन्हे), संतोष पाटील सहायक निरीक्षक संतोष पाटील, अभिजीत जाधव, उपनिरीक्षक सिध्दनाथ बाबर, कर्मचारी सुरज सुतार, प्रशांत गिलबीले, विभीषन कन्हेरकर, तात्या शिंदे, बापुसाहेब धुमाळ, बाबाजान इनामदार, नितीन ढोरजे, राजेंद्र मारणे, शाम बाबा, सचिन नरुटे, विजय गंभीरे, विक्रम कुदळ, जावेद पठाण, विक्रम जगदाळे, नितीन गेंगजे, प्रमोद कदम, कौतेय खराडे, नुतन कोंडे यांच्या पथकाने केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.