Wakad Crime News : वाहने चोरणाऱ्या तीन सराईतांना अटक; सात दुचाकी, मोबाईल जप्त

एमपीसी न्यूज – वाहन चोरी करणाऱ्या तीन सराईत चोरट्यांना वाकड पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून दोन लाख 50 हजार 999 रुपये किमतीच्या सात दुचाकी आणि एक मोबाईल फोन जप्त करण्यात आला आहे.

शुभम जयभारत कांबळे (वय 21, रा. भक्ती शक्ती चौकाजवळ, अंकुश चौक, ओटा स्किम, निगडी पुणे), मनोज वसंत जाधव (वय 21, रा. अंकुश चौक, स्मशानभुमी, बोराडेचाळ, ओटा स्किम, निगडी पुणे), प्रविण प्रताप सोनवणे (वय 26, रा. काळेवाडी पुणे (फिरस्ता). मुळ रा. खेडी बोकरी, ता.चोपडा, जि. जळगाव) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, वाहन चोरीच्या गुन्ह्याबाबत माहिती काढून रेकॉर्डवरील गुन्हेगारांना ‘चेक’ करण्याच्या सूचना पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी दिल्या होत्या. त्यानुसार वाकड पोलीस तपास करीत होते. रात्र गस्त घालत असताना तपास पथकातील कर्मचारी बापुसाहेब धुमाळ, प्रशांत गिलबिले यांना माहिती मिळाली की, बिर्ला हॉस्पिटल थेरगाव येथे दोन इसम संशयीतरित्या थांबले आहेत. ते दोघे वाहन चोर आहेत.

त्यानुसार पोलिसांनी सापळा लावून शुभम आणि मनोज यांना ताब्यात घेतले. त्यांनी त्यांचा तिसरा साथीदार प्रवीण याच्यासोबत मिळून पिंपरी चिंचवड शहरातून सात दुचाकी आणि देहूरोडमधून एक मोबाईल चोरल्याचे सांगितले. पोलिसांनी त्यांच्याकडून सात दुचाकी आणि एक मोबाईल फोन, असा एकूण 2 लाख 50 हजार 999 रुपयांचा ऐवज हस्तगत केला.

या कारवाईमुळे वाकड पोलीस ठाण्यातील दोन, चिंचवड, निगडी, पिंपरी पोलीस ठाण्यातील प्रत्येकी एक असे एकूण पाच वाहन चोरीचे, देहूरोड पोलीस ठाण्यातील एक मोबाईल चोरीचा असे सहा गुन्हे उघडकीस आले आहेत. दोन दुचाकीबाबत तपास सुरू आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उप आयुक्त आनंद भोईटे, सहाय्यक पोलीस आयुक्त श्रीकांत डिसले यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरिक्षक विवेक मुगळीकर, पोलीस निरीक्षक संतोष पाटील, पोलीस निरीक्षक सुनिल टोणपे, सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिजीत जाधव, पोलीस अंमलदार बिभीषण कन्हेरकर, बाबाजान इनामदार, राजेंद्र काळे, बापुसाहेब धुमाळ, विक्रम कुदळ, विजय गंभीरे, जावेद पठाण, नितीन ढोरजे, बंदु गिरे, प्रशांत गिलबीले, अतिश जाधव, नितीन गेंगजे, कौंतेय खराडे, कल्पेश पाटील, तात्या शिंदे यांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.