Wakad crime News : गांजा विक्री करणाऱ्या दोघांना अटक; दोन किलो गांजा जप्त

एमपीसी न्यूज – गांजा विक्री करणाऱ्या दोघांना वाकड पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून 40 हजारांचा एक किलो 950 ग्राम गांजा जप्त करण्यात आला आहे.

अलका विष्णू धनवडे (वय 43 ), अतुल भीमराव जाधव (वय 20, दोघे रा. काळाखडक झोपडपट्टी, वाकड) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी पोलीस हवालदार बी. पी. इनामदार यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाकड पोलिसांना माहिती मिळाली की, थेरगाव येथे दोघेजण गांजा विक्री करीत आहेत. त्यानुसार, पोलिसांनी सापळा रचून थेरगाव येथील पंडित पेट्रोल पंपासमोरून आरोपी अलका आणि अतुल या दोघांना एका रिक्षासह (एमएच 14 / सीयु 2612) ताब्यात घेतले.

दोघांची झडती घेतली असता त्यांच्याकडे एक किलो 950 ग्राम वजनाचा गांजा आढळून आला. गांजा जप्त करून दोघांना पोलिसांनी अटक केली आहे.

वाकड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.