Wakad Crime News : गाडीला कट मारण्याच्या कारणावरून दोघांना बेदम मारहाण; चौघांना अटक

एमपीसी न्यूज – गाडीला कट मारण्याच्या कारणावरून पाच जणांनी दोघांना बिअरच्या बाटल्या आणि लोखंडी रॉडने मारहाण करून गंभीर जखमी केले. तसेच एका तरुणाकडील रोख रक्कम जबरदस्तीने काढून नेली. हा प्रकार शुक्रवारी (दि. 17) रात्री थेरगाव येथे घडला. याप्रकरणी पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे.

ऋषिकेश महादेव चव्हाण (वय 24), शुभम चंद्रकांत पांचाळ (वय 21), नितेश संतोष कदम (वय 23, सर्व रा. थेरगाव), राहुल नाईकनवरे अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्यासह एका अनोळखी इसमाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी ओंकार तुपेरे (वय 18, रा. थेरगाव) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी ओंकार आणि श्री गणेश सायबर कॅफेचे मालक गणेश दारवटकर दुचाकीवरून जात होते. थेरगाव येथे विरुद्ध दिशेने येणा-या आरोपीच्या दुचाकीला गणेश यांच्या गाडीचा कट बसला. त्यावरून सर्व आरोपींनी बिअरच्या बाटल्या डोक्यात फोडून, रॉडने डोक्यात मारून गंभीर जखमी करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. आरोपींनी गणेश यांच्याकडील सहा हजार रुपये जबरदस्तीने काढून घेतले, असे फिर्यादीत म्हटले आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.