Wakad Crime News : अवघ्या दहा मिनिटात पावणे दोन लाखांची चोरी

एमपीसी न्यूज – अज्ञात चोरट्यांनी उघड्या दरवाजा वाटे चोरी करून एक लाख 76 हजारांचा ऐवज चोरून नेला. ही घटना गुरुवारी (दि. 23) सकाळी राजवाडेनगर, काळेवाडी येथे घडली. हा प्रकार केवळ दहा मिनिटात घडला आहे.

वरूण शशिकुमार पिल्ले (वय 28, रा. राजवाडेनगर, काळेवाडी) यांनी याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अनोळखी चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी सकाळी पावणे आठ वाजताच्या सुमारास अनोळखी चोरट्याने फिर्यादी यांच्या घरात उघड्या दरवाजा वाटे प्रवेश केला. घरातील बेडरूम मधील लोखंडी व लाकडी कपाट उचकटून त्यातून एक लाख 76 हजार 550 रुपयांचे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम चोरून नेली. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.