Wakad Crime News : मौजमजेसाठी दुचाकी चोरणाऱ्यास अटक; 12 दुचाकी जप्त

0

एमपीसी न्यूज – मौजमजेसाठी दुचाकी चोरणाऱ्या चोरट्याला वाकड पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून चार लाख 22 हजार रुपये किमतीच्या बारा दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत.

दिलीपकुमार शालिग्राम विश्वकर्मा (वय 22, रा. ठोंबरे चाळ, पॅरीस कॉलनी, तापकीर नगर, काळेवाडी) असे अटक केलेल्या दुचाकी चोरट्याचे नाव आहे.

पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी दिलेल्या माहितीनुसार, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बिभीषण कन्हेरकर आणि पोलीस नाईक विजय गंभीरे यांना माहिती मिळाली की, सराईत वाहनचोर पाचपीर चौक, काळेवाडी येथे येणार आहे. त्यानुसार पोलिसांनी सापळा लावून आरोपी दिलीपकुमार विश्वकर्मा याला ताब्यात घेतले.

_MPC_DIR_MPU_II

त्याला विश्वासात घेऊन त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने मौजमजेसाठी बारा दुचाकी चोरी केल्याची पोलिसांना कबुली दिली. त्यानुसार पोलिसांनी त्याच्याकडून चार लाख 22 हजार रुपये किमतीच्या बारा दुचाकी हस्तगत केल्या.

यामुळे वाकड पोलीस ठाण्यातील सात आणि शिक्रापूर पोलीस ठाण्यातील एक असे एकूण आठ गुन्हे उघडकीस आले आहेत. इतर चार वाहनांच्या मालकाचा शोध वाकड पोलीस घेत आहेत.

पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, अप्पर आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त आनंद भोईटे, सहाय्यक आयुक्त श्रीकांत डिसले यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर, निरीक्षक संतोष पाटील, सुनील टोणपे, सहाय्यक निरीक्षक संतोष पाटील, अभिजीत जाधव, उपनिरीक्षक सिद्धनाथ बाबर, सहाय्यक उपनिरीक्षक बिभीषण कन्हेरकर, कर्मचारी बाबाजान इनामदार, विक्रम जगदाळे, नितीन ढोरजे, बापूसाहेब धुमाळ, नितीन गेंगजे, सचिन नरूटे, विजय गंभीरे, विक्रम कुदळ, जावेद पठाण, प्रमोद कदम, प्रशांत गिलबिले, अतीश जाधव, कल्पेश पाटील, तात्या शिंदे, सुरज सुतार यांच्या पथकाने ही कारवाई केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Leave a comment