Wakad Crime News : ‘खोटा गुन्हा का केलात, गुन्हा मागे घ्या’ म्हटल्याने दोन तरुणांना बेदम मारहाण

एमपीसी न्यूज – ‘माझ्यावर भंगारवाल्याची खोटी केस का केली. केस मागे घ्या’ अशी विचारणा करण्यासाठी गेलेल्या तरुणाला चार जणांनी मिळून बेदम मारहाण केली. ही घटना सप्टेंबर 2020 मध्ये घडली असून याबाबत 10 फेब्रुवारी 2021 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मकसूद चौधरी (रा. दगडूपाटील नगर, थेरगाव), मेहबूब शहा, मोबिन खान, सावन शहा अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. याबाबत आरिफ सिद्धिक शेख (वय 25, रा. पडवळनगर, थेरगाव) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

_MPC_DIR_MPU_II

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादी आरिफ यांच्या विरोधात एक गुन्हा दाखल केला होता. त्याबाबत आरिफ आरोपींना जाब विचारण्यासाठी गेले होते. ‘तुम्ही माझ्यावर भंगारवाल्याची खोटी केस का केली. केस मागे घ्या’ असे आरिफ यांनी आरोपींना सांगितले.

त्यावरून आरोपींनी फिर्यादी आरिफ आणि त्यांचा मित्र गोविंदा दुबे यांना हाताने, लोखंडी रॉडने मारहाण केली. त्यात आरिफ यांच्या हाताला, डोक्याला, ओठाला, नाकाला व पायावर गंभीर दुखापत झाली. तसेच त्यांच्या मित्राच्या डोक्याला, पायाला, छातीला मुक्का मार लागून दुखापत झाली.

वाकड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.