Wakad crime News : टेम्पोच्या धडकेत अनोळखी इसमाचा मृत्यू

एमपीसी न्यूज – भरधाव वेगात जाणा-या टेम्पोने एका अनोळखी व्यक्तीला धडक दिली. यामध्ये जखमी झालेल्या व्यक्तीचा मृत्यू झाला. हा अपघात 1 नोव्हेंबर रोजी सायंकाळी सहा ते सात वाजताच्या सुमारास डांगे चौक, थेरगाव येथे घडला.

टेम्पो (एम एच 14 / 8972) चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीस नाईक सचिन कुबेर जाधव यांनी याबाबत गुरुवारी (दि. 5) वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डांगे चौक, थेरगाव येथून बिर्ला हॉस्पिटलकडे जाणा-या मार्गावर आरोपी टेम्पो चालकाने भरधाव वेगात टेम्पो चालवून एका व्यक्तीला जोरात धडक दिली. यामध्ये त्या व्यक्तीचा गंभीर जखमी होऊन मृत्यू झाला. अपघात झाल्यानंतर टेम्पो चालक घटनास्थळी न थांबता पळून गेला. मृत्यू झालेल्या व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नाही.

वाकड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.