Wakad crime News : वाकड पोलिसांचा जुगार अड्ड्यावर छापा; सहा जणांना अटक

एमपीसी न्यूज – वाकड पोलिसांनी रहाटणी येथील सितारा गार्डन चौकातील चिंतामणी डेअरी येथे सुरु असलेल्या एका जुगार अड्ड्यावर छापा टाकला. त्यामध्ये पोलिसांनी जुगाराचे साहित्य जप्त करत सहा जणांना अटक केली.

चंद्रकांत नंदकुमार सुरवसे (वय 38), उमेश भाऊराव गाडगे /९वय 37), उमेश गहिनीनाथ ठाकर (वय 31), अंकुश नाटंबे (सर्व रा. रहाटणी), निलू (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही), दिनेश बलदानी (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

याबाबत पोलीस शिपाई टी. आर. शिंदे यांनी गुरुवारी (दि. 29) वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रहाटणी येथील सितारा गार्डन चौकातील चिंतामणी डेअरी येथे कल्याण मटका जुगाराचा खेळ सुरु असल्याची माहिती वाकड पोलिसांना मिळाली. त्यानुसार, पोलिसांनी बुधवारी (दि. 28) मटका अड्ड्यावर छापा टाकला.

यामध्ये चार हजारांचा मोबाईल फोन व 500 रुपयांची रोकड असा ऐवज जप्त केला. तसेच जुगार खेळणा-या सहा जणांना अटक केली.

वाकड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.