Wakad Crime News : फोनवर शिवीगाळ केल्याची तक्रार देऊन चौकीच्या बाहेर येताच महिलेशी गैरवर्तन करत मारहाण

एमपीसी न्यूज – अज्ञात व्यक्‍तीने महिलेला फोनवर शिवीगाळ केली. त्याबाबत महिला काळेवाडी पोलीस चौकीत तक्रार देण्यासाठी आली. तक्रार देऊन पोलीस चौकीच्या बाहेर आली असता अज्ञात व्यक्तीने महिलेचा विनयभंग केला. ही घटना गुरुवारी (दि. 16) रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास काळेवाडी येथे घडली.

याबाबत पीडित महिलेने गुरुवारी (दि. 16) वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात व्यक्‍तीच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी सायंकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास आदर्शनगर, काळेवाडी येथे असताना पीडित महिलेला अज्ञात व्यक्‍तीने फोन करून शिवीगाळ केली. याबाबत पीडित महिला तक्रार देण्यासाठी काळेवाडी पोलीस चौकीत आली. तक्रार देऊन पीडित महिला चौकीबाहेर आली असता एक अज्ञात व्यक्‍ती त्यांच्याजवळ आली. त्या व्यक्‍तीने शिवीगाळ करीत पोलीस चौकीच्या समोरच महिलेला फरफटत नेऊन तिचा विनयभंग केला. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.