Wakad Crime News : महिलेची 25 लाखांची फसवणूक; दोघांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – महिलेकडून 25 लाख रुपये घेऊन त्या रकमेतून दोघांनी ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ येथे फ्लॅट खरेदी केला. त्यानंतर महिलेचे पैसे न देता त्यांची फसवणूक केली. ही घटना 1 मार्च 2019 ते 10 ऑगस्ट 2021 या कालावधीत रहाटणी येथे घडली.

सुनंदा मछिंद्र साठे (रा. रहाटणी) यांनी याबाबत वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, मनोज मुरलीधर जाधव, महेश मनोज जाधव (दोघे रा. रानमळा सातव नगर, कडूस, पुणे) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मनोज आणि महेश हे पिता-पुत्र आहेत. त्या दोघांनी फिर्यादी साठे यांच्याकडून 25 लाख रुपये घेतले. त्या रकमेतून आरोपींनी अंबरनाथ, जि. ठाणे येथे 635 चौरस फूट क्षेत्रफळ असलेला एक फ्लॅट खरेदी केला. फिर्यादी यांचे पैसे परत न करता त्यांची फसवणूक केली. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.