Wakad Crime News : सुट्टे पैसे मागण्याच्या बहाण्याने महिलेची फसवणूक

एमपीसी न्यूज – सुट्टे पैसे मागण्याच्या बहाण्याने जवळ येऊन महिलेचे 60 हजार रुपयांचे दागिने फसवणूक करून चोरून नेले. ही घटना शुक्रवारी (दि. 30) दुपारी काळेवाडी फाटा येथे घडली.

शोभा लक्ष्मीकांत कदम (वय 43, रा. पवार गल्ली क्रमांक-8, काळेवाडी फाटा, थेरगाव) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दोन अनोळखी चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी दुपारी दीड वाजताच्या सुमारास आरोपी हे फिर्यादीचे जवळ आले. त्यांनी फिर्यादीकडे सुट्टे पैसे मागितले. त्यानंतर आरोपींनी जवळ दोन लाख रुपये असल्याचे सांगून कागदाचा बंडल फिर्यादी यांच्या पिशवीत टाकला. ‘इतना सोना है कोई तो चुरायेगा,’ असे म्हणून शोभा यांचा विश्वास संपादन केला. तसेच फिर्यादी शोभा यांना दागिने काढायला लावून रुमालात ठेवण्यास सांगितले. हातचलाखी करून फसवून चोरटे शोभा यांचे 60 हजारांचे सोन्याचे दागिने घेऊन गेले. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.