Wakad Crime News: बांधकाम साईटवर पाय घसरून पडल्याने कामगार गंभीर जखमी, तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – बांधकाम साईटवर काम करत असताना पाय घसरून पडल्याने कामगार गंभीर जखमी झाला. याबाबत तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना शनिवारी (दि. 19) सकाळी साडेनऊ वाजता दत्तनगर, थेरगाव येथे घडली.

संदीप मेमाणे (रा. दत्तनगर, वाकड), महादेव म्हस्के (रा. न-हे, पुणे), राहुल अविनाश सोनवणे (रा. रहाटणी, वाकड) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी प्रतिभा सुनील निकम (वय 32, रा. दत्तनगर, थेरगाव, वाकड) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

सुनील निकम (वय 48) असे गंभीर जखमी झालेल्या कामगाराचे नाव आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी संदीप याच्या घराचे बांधकाम सुरु आहे. तर आरोपी महादेव आणि राहुल हे बांधकामचे ठेकेदार आहेत. बांधकाम सुरु असताना कामगारांच्या सुरक्षेची कोणतीही व्यवस्था आरोपींनी पुरवली नाही. तसेच हयगयीने व हलगर्जीपणे बांधकाम सुरु ठेवले.

या बांधकामावर फिर्यादी प्रतिभा यांचे पती सुनील काम करत होते. शनिवारी सकाळी साडेनऊ वाजता काम करत असताना सुनील यांचा पाय घसरला आणि ते सुमारे 30 फूट उंच बांधकामावरून खाली पडले. डोक्याला, कमरेला, पाठीला गंभीर दुखापत झाली. तसेच मेंदू व फुफ्फुसात गंभीर दुखापत झाली. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.