Wakad Crime News : पत्ते खेळण्यास नकार दिल्याने तरुणाला मारहाण

0

एमपीसी न्यूज – गॅरेजमध्ये झोपलेल्या तरुणाने रात्री उशिरा पत्ते खेळण्यास नकार दिला. त्यावरून एकाने तरुणाला बेदम मारहाण केली. ही घटना गुरुवारी (दि. 15) रात्री अकरा वाजता कस्पटे वस्ती, वाकड येथे विश्वराज ऑटो मोबईल दुकानासमोर घडली.

सागर बालाजी सूर्यवंशी (वय 24, रा. कस्पटे वस्ती, वाकड) असे जखमी तरुणाचे नाव आहे. त्यांनी याबाबत शुक्रवारी (दि. 16) वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी हनुमंत गोरक्ष कासुळे (रा. कस्पटे वस्ती, वाकड) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सागर त्यांच्या गॅरेजमध्ये झोपले होते. रात्री अकरा वाजता आरोपी फिर्यादी यांच्याकडे आला आणि आपण पत्ते खेळू म्हणाला. रात्री उशीर झाल्याने फिर्यादी यांनी त्याला पत्ते खेळण्यासाठी नकार दिला.

त्या रागातून आरोपीने फिर्यादी यांना डोक्यात मारून जखमी केले. तसेच शिवीगाळ करून मारण्याची धमकी देऊन निघून गेला.

वाकड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.