Wakad crime news: पूर्ववैमनस्यातून तरुणाला चिकन तोडण्याच्या सत्तूरने मारहाण

एमपीसी न्यूज – जुन्या भांडणाच्या कारणावरून एका तरुणाला चार जणांनी मिळून गज आणि चिकन तोडण्याचा सत्तूरने मारहाण केली. यामध्ये तरुण गंभीर जखमी झाला. ही घटना रविवारी (दि. 20) रहाटणी येथे घडली.

प्रदीप राजेंद्र मोरे (वय 25, रा. गाडीतळ, हडपसर) असे जखमी तरुणाचे नाव आहे. त्यांनी याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून मळू गेरंगे, आकाश भिसे, लखन गेरंगे, सोमनाथ गायकवाड यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी मोरे आणि आरोपी यांच्यात पूर्वी भांडण झाले होते. त्या भांडणाच्या रागातून आरोपींनी मोरे यांना रहाटणी येथील कोकणे चौक येथे गाठले. तेथे आरोपींनी केबल वायर, लोखंडी गज आणि चिकन तोडण्याच्या सत्तूरने मोरे यांना बेदम मारहाण केली. यामध्ये मोरे गंभीर जखमी झाले.

वाकड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.