Wakad Crime News : विक्रीसाठी गांजा बाळगल्याप्रकरणी तरुणाला अटक

एमपीसी न्यूज – विक्रीसाठी गांजा बाळगल्याप्रकरणी एका तरुणाला गुन्हे शाखा युनिट चारच्या पोलिसांनी अटक केली आहे. ही कारवाई बुधवारी (दि. 24) दुपारी पावणे तीन वाजता थेरगाव येथे करण्यात आली.

विकास सुभाष काळे (वय 23, रा. म्हातोबानगर झोपडपट्टी, वाकड) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत पोलीस शिपाई धनाजी शिंदे यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, थेरगाव येथे डांगे चौकाकडून रावेत कडे जाणा-या रस्त्याच्या फूटपाथवर एक तरुण गांजा घेऊन थांबला असल्याची माहिती गुन्हे शाखा युनिट चारच्या पोलिसांना मिळाली.

त्यानुसार पोलिसांनी सापळा लावून विकास याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून 33 हजार 475 रुपये किमतीचा एक किलो 257 ग्रॅम वजनाचा गांजा आणि गांजा विक्रीतून मिळालेली दोन हजार 50 रुपये रोख रक्कम पोलिसांनी जप्त केली.

वाकड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.