Wakad Crime News : झोमॅटोच्या डिलिव्हरी बॉयला जीवे मारण्याची धमकी देत लुटले

मपीसी न्यूज – झोमॅटोच्या डिलिव्हरी बॉयला जीवे मारण्याची धमकी देत चार जणांनी मिळून लुटले. रोख रक्कम, मोबाईल फोनसह झोमॅटोचे पार्सल देखील चोरट्यांनी चोरून नेले. ही घटना शनिवारी (दि. 13) रात्री ज्योतिबा नगर, रहाटणी येथे घडली.

राजरतन विजय पाईकराव (वय 29, रा. मारुंजी. मु रा. पिंपरखेड, ता. हदगाव, जि. नांदेड) यांनी याबाबत वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी चार अनोळखी चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी पाईकराव झोमॅटो कंपनीत डिलिव्हरी बॉयचे काम करतात. ते शनिवारी रात्री ऑर्डर देण्यासाठी दुचाकीवरून जात होते. ते ज्योतिबा नगर, रहाटणी येथे रामदास स्वीट मार्ट या दुकानाच्या समोर आले असता दोन दुचाकीवरून चार आरोपी आले. त्यांनी फिर्यादी यांना थांबवून जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच फिर्यादी यांच्याकडील 700 रुपयांची रोकड, एक मोबाईल फोन आणि झोमॅटोचे पार्सल असा एकूण 10 हजार 700 रुपयांचा ऐवज जबरदस्तीने चोरून नेला. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.