Wakad Crime News : पतीच्या विवाहबाह्य संबंधास विरोध करणाऱ्या पत्नीचा छळ

एमपीसी न्यूज – पतीच्या विवाहीबाह्य संबंधांना पत्नीने विरोध केला. त्यावरून पती आणि सासरच्या मंडळींनी विवाहितेचा छळ केला. हा प्रकार सन 2008 पासून 12 एप्रिल 2021 या कालावधीत बेलठीकानगर, थेरगाव येथे घडला.

पती विजय दगडू फरांदे (वय 50, रा. पवारनगर, थेरगाव), सासू सुमन दगडू फरांदे, नणंद सविता तानाजी जाधव, दीर अण्णा उर्फ धनंजय दगडू फरांदे, जाऊ सिंधू अण्णा उर्फ धनंजय फरांदे अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत पिडीत विवाहितेने सोमवारी (दि. 12) वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

_MPC_DIR_MPU_II

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी पती विजय याचे विवाहबाह्य संबंध होते.त्यासाठी फिर्यादी विवाहितेने विरोध केला. त्यावरून विजय याने विवाहितेला वारंवार शिवीगाळ, मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली.

हा प्रकार विवाहितेने सासू, नणंद, दीर, जाऊ यांना सांगितला. त्यानंतर अन्य आरोपींनी विवाहीतेबाबत आरोपी पती विजय याला उलटसुलट सांगून भडकावून दिले. त्यावरून विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

वाकड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.