Wakad crime News : वाकडमधील अनिकेत चौधरी टोळीवर मोक्काची कारवाई

अनिकेत चौधरीची टोळी वाकड परिसरात स्वतःच्या वर्चस्वासाठी आणि आर्थिक फायद्यासाठी टोळी बनवून संघटितपणे गुन्हे करीत असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे.

एमपीसी न्यूज – वाकड परिसरातील सराईत गुन्हेगार अनिकेत चौधरी याच्या टोळीवर पिंपरी चिंचवड पोलिसांनी मोक्काची कारवाई केली आहे. त्याबाबतचे दोषारोपपत्र दाखल करण्याच्या मंजूरीचे आदेश पोलीस आयुक्तांनी आज (बुधवारी, दि. 26) दिले.

टोळीप्रमुख अनिकेत अर्जुन चौधरी (रा. प्रेरणा शाळेजवळ, लक्ष्मणनगर, थेरगाव), धीरज श्रीकांत शिंदे (वय 22, रा. जीवननगर, ताथवडे), अजय सुधाकर शिरसाठ (वय 20, रा. नरहरी सोसायटी, जीवननगर, ताथवडे), मयुर शिवाजी भोसले (वय 23, रा. नरहरी सोसायटी, जीवननगर, ताथवडे), समीर देवीदास बोरकर (वय 24, रा. साई पी.जी. डी. मार्ट शेजारी, हिंजवडी) या टोळीवर कारवाई करण्यात आली आहे.

अनिकेत चौधरीची टोळी वाकड परिसरात स्वतःच्या वर्चस्वासाठी आणि आर्थिक फायद्यासाठी टोळी बनवून संघटितपणे गुन्हे करीत असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे.

त्यामुळे सहाय्यक पोलीस आयुक्त श्रीधर जाधव यांनी उपायुक्त विनायक ढाकणे यांच्या मार्फत महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियमानुसार ( मोक्का) टोळीवर कारवाई करण्यासाठी आयुक्तांच्या मंजुरीसाठी प्रस्ताव पाठवला होता.

आयुक्तांनी त्या प्रस्तावाला आज मान्यता दिली असून टोळीविरुद्धचे दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले जाणार आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त संदिप बिष्णोई, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त (गुन्हे) सुधीर हिरेमठ उपायुक्त विनायक ढाकणे, सहाय्यक आयुक्त आर. आर. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राजकुमार शिंदे, पोलीस हवालदार सचिन चव्हाण यांच्या पथकाने केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.