Wakad Crime News : पोलीस असल्याची बतावणी करून वृद्ध दाम्पत्याचे दोन लाखांचे दागिने पळवले

एमपीसी न्यूज – पोलीस असल्याची बतावणी करून तीन अनोळखी इसमांनी एका वृद्ध दाम्पत्याचे एक लाख 85 हजारांचे दागिने पळवून नेले. ही घटना मंगळवारी (दि. 30) सकाळी वाकड येथे घडली.

रामचंद्र सदाशिवराव पंचगडे (वय 77, रा. कस्पटे वस्ती, वाकड) यांनी याबाबत वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार तीन अनोळखी चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी सकाळी साडेदहा वाजताच्या सुमारास फिर्यादी आणि त्यांच्या पत्नी वाकड येथील छत्रपती चौकातून काळेवाडी फाट्याकडे जाणा-या रस्त्याने जात होते. त्यावेळी तीन अनोळखी व्यक्ती त्यांच्याकडे आल्या.

त्यांनी पोलीस असल्याची बतावणी करून फिर्यादी आणि त्यांच्या पत्नीचे एक लाख 85 हजार रुपये किमतीचे 46 ग्रॅम सोन्याचे दागिने पळवून नेले.

वाकड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.