Wakad Crime News : मद्यपी बापाने पोटच्या मुलासोबत केले ‘हे’ कृत्य

एमपीसी न्यूज – दारू पिऊन आलेल्या वडिलांनी घरातील साहित्य इतरत्र हलविले. त्याचा जाब मुलाने विचारला असता मद्यपी बापाने मुलाच्या मांडीला चावा घेऊन त्याला जखमी केले. ही घटना बुधवारी (दि. 10) रात्री साडेदहा वाजता रामनगर ताथवडे येथे घडली.

राहुल किरण मोरे (वय 27, रा. रामनगर, ताथवडे) असे जखमी मुलाचे नाव आहे. याबाबत त्यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी किरण दिनकर मोरे (वय 55) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी राहुल आणि आरोपी हे मुलगा आणि वडील आहेत. आरोपी किरण याला दारूचे व्यसन आहे. बुधवारी रात्री राहुल यांची बहीण आणि आजी घरी असताना किरण दारू पिऊन घरी आला. त्याने घरातील संगणक आणि टीव्ही इतरत्र हलविले.

त्याचा जाब राहुल यांनी विचारला असता आरोपी बापाने राहुल यांना आरडाओरडा करत शिवीगाळ करून झटापट केली. त्यानंतर किरण याने मुलगा राहुल यांच्या मांडीला चावा घेऊन जखमी केले. तसेच हाताने गळ्याला ओरखडले. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वाकड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.