Wakad Crime News : थेरगावात तीन तासात पावणे तीन लाखांचे दागिने लंपास

एमपीसी न्यूज – तीन तासांसाठी बाहेर गेलेल्या व्यक्तीच्या घरात अज्ञात चोरट्यांनी चोरी केली. घरातून दोन लाख 82 हजार रुपयांचे दागिने चोरट्यांनी चोरून नेले. ही घटना बुधवारी (दि. 17) सायंकाळी सव्वा सात ते रात्री सव्वा दहा या कालावधीत शिवदर्शन कॉलनी, थेरगाव येथे घडली.

प्रशांत शांताराम मोरे (वय 33) यांनी याबाबत वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

_MPC_DIR_MPU_II

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी प्रशांत हे त्यांच्या आईला भेटण्यासाठी बुधवारी सायंकाळी सव्वासात वाजता घराबाहेर गेले. आईला भेटून ते रात्री सव्वादहा वाजता परत घरी आले.

दरम्यानच्या कालावधीत अज्ञात चोरट्याने त्यांच्या घरात कोयंडा तोडून प्रवेश केला. घरातून दोन लाख 82 हजार रुपये किमतीचे 73.909 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने चोरी करून नेले.

वाकड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.