Wakad : सोसायटीचा रस्ता अडविणा-यावर गुन्हा

एमपीसी न्यूज – सोसायटीच्या मालकीच्या पर्यायी रस्ता अडवून सोसायटीतील नागरिकांना येण्या-जाण्यासाठी अटकाव केल्याबद्दल एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 13 मे रोजी सकाळी औंध-रावेत रोडवर वुड्स सोसायटी येथे घडली.

गणेश पद्मनाभम कबाडी (वय 50, रा. वुड्स सोसायटी, औंध-रावेत रोड, वाकड) यांनी याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी नितीन गारवे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी नितीन याने सोसायटीच्या मालकीचा पर्यायी रस्ता बुम बार टाकून रहदारीसाठी बंद केला. यामुळे सोसायटीतील नागरिकांना येण्या-जाण्यासाठी नाहक त्रास सहन करावा लागला. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वाकड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.