Wakad Crime : काळेवाडी येथील मटका अड्ड्यावर सामाजिक सुरक्षा पथकाचा छापा; 17 जणांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – काळेवाडी श्रीनगर येथील एका पत्र्याच्या शेडमध्ये सुरु असलेल्या मटका अड्ड्यावर पिंपरी-चिंचवड सामाजिक सुरक्षा पथकाने छापा मारला. यामध्ये पोलिसांनी 47 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तसेच 17 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

संदीप किसन तरडे (वय 38, रा. रहाटणी), गजेंद्र शिवाजी इडले (वय 35, रा. तळेगाव दाभाडे), सतीश वसंत कांबळे (वय 34, रा. थेरगाव), यश सतीश रसाळ (वय 19, रा. काळेवाडी), संतोष सुभाष गिरी (वय 24, रा. थेरगाव), अमर भीमराव गाडे (वय 33, रा. थेरगाव), विजय शंकर शिंदे (वय 34, रा. थेरगाव), मोहन नर्सिंग कनामे (वय 31, रा. थेरगाव). सुनील विश्वनाथ ठाकूर (वय 23, रा. थेरगाव), विजय राहुल तलवारे (वय 19, रा. थेरगाव) आणि अन्य सात जण अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

याप्रकरणी सामाजिक सुरक्षा पथकाचे पोलीस हवालदार सुनील जगन्नाथ सिरसाट यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी संदीप तरडे हा श्रीनगर काळेवाडी येथे एका पत्र्याच्या शेडमध्ये कल्याण मटका जुगार चालवत असल्याची माहिती सामाजिक सुरक्षा पथकाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी छापा मारून कारवाई करत 17 जणांवर गुन्हा दाखल केला. यामध्ये पोलिसांनी 47 हजार 140 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.