Wakad Crime : सीडीआर डाटा लग्नात प्रसारीत करण्याची धमकी देत मागितली एक लाखाची खंडणी

एमपीसी न्यूज – माझ्याकडे तुझा डाटा व सिडीआर डाटा (Wakad Crime) आहे. मला पैसे दिले नाहीस तर लग्नात सर्व डाटा स्क्रीनवर प्रसारीत करेण अशी धमकी देत 1 लाख रुपयांची खंडणी मागितली. हा प्रकार 2 फेब्रुवारी ते 5 फेब्रुवारीच्या दरम्यान घडला.

महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार, 7488842680 या क्रमांक धारकावर वाकड पोलीस ठाण्यात सोमवारी (दि.6) गुन्हा दाखल केला आहे.

Chinchwad Bye Election : ‘मविआ’त चिंचवडची जागा राष्ट्रवादीला; नाना काटे यांना उमेदवारी जाहीर

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांना संबंधीत मोबाईल क्रमांकावरून (Waka Crime) अनोळखी व्यक्तीने त्याच्याकडे फिर्यादीचा डाटा व सिडीआर डाटा असल्याचे सांगितले. हा डाटा फिर्यादीच्या पतीकडे व नातेवाईकांकेडे तसेच 10 पेब्रुवारीला लग्नात स्क्रीनवर प्रसारीत करण्याची धमकी दिली. डाटा प्रसारीत करायचा नसेल तर सुरुवातील 50 हजार रुपये व नंतर 1 लाख रुपये दे अशी खंडणी मागितली. यावरून वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.