Wakad Crime : बलात्काराचा खोटा गुन्हा नोंदवून जेलमध्ये पाठवण्याची धमकी; महिलेवर गुन्हा

एमपीसी न्यूज – कपडे धुवत असलेल्या सासू-सुनेचे फोटो आणि व्हिडीओ काढले. त्यांनंतर सासू-सुनेला शिवीगाळ केली. हा संपूर्ण प्रकार मोबईलमध्ये शूट करत असलेल्या तरुणाला शिवीगाळ करणा-या महिलेने बलात्काराचा खोटा गुन्हा नोंदवून जेलमध्ये पाठवण्याची धमकी दिली. ही घटना शनिवारी (दि. 31) थेरगाव येथे घडली.

कौशल्या गोलाणी (वय 45, रा. थेरगाव) असे गुन्हा दाखल झालेल्या महिलेचे नाव आहे. याबाबत शोभा शिवाजी मुठाळ (वय 49, रा. थेरगाव) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी मुठाळ त्यांच्या सुनेसोबत शनिवारी (दि. 31) सकाळी पावणे दहा वाजताच्या सुमारास घरासमोर कपडे धुवत होत्या. त्यावेळी आरोपी कौशल्या तिथे आली. तिने तिच्या मोबईल फोनमध्ये फिर्यादीचे फोटो आणि व्हिडीओ शूटिंग केले. त्यानंतर तिने फिर्यादी यांच्या कॉलनीमधील महिला व पुरुषांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली.

हा सर्व प्रकार फिर्यादी यांच्या शेजारी राहणारा मुलगा सौरभ तनपुरे याने त्याच्या मोबईल फोनमध्ये शूट केला. कौशल्या हिने सौरभला ‘मी तुझ्या विरोधात बलात्काराचा खोटा गुन्हा नोंदवून तुला जेलमध्ये पाठवून देईल’ अशी धमकी दिली. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.