Wakad Crime : जमीन विक्रीच्या बहाण्याने दोघांची सात लाखांची फसवणूक; तिघांवर गुन्हा

एमपीसी न्यूज – एका व्यक्तीला विकलेली जमीन पुन्हा विकण्याचा प्रयत्न करून दोघांची 6 लाख 95 हजारांची फसवणूक केली. याबाबत तिघांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 6 जुलै 2017 ते 26 नोव्हेंबर 2020 या कालावधीत थेरगाव येथे घडला.

पांडुरंग दगडू पडवळ, विश्वनाथ पांडुरंग पडवळ (दोघे रा चिंचवडगाव), मेहबूब दस्तागिर शेख (रा. काळेवाडी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत मिनाज अश्फाक पठाण (वय 41, रा. थेरगाव) यांनी गुरुवारी (दि. 26) वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, थेरगाव येथील सर्व्हे नंबर 11, हिस्सा नंबर 2, सिटी सर्व्हे 1676 येथील 1हजार 230 चौरसफूट क्षेत्र ही मालमत्ता आरोपींनी यापूर्वी विजय गव्हाळकर यांना विकली आहे. तीच जमीन पुन्हा फिर्यादी आणि त्याच्या भावाला विकण्याचे आरोपींनी अमिश दाखवले. त्यासाठी आरोपींनी फिर्यादी आणि त्यांच्या भावाकडून 6 लाख 95 हजार रुपये घेऊन फसवणूक केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.