Wakad Crime : रस्त्याच्या मधोमध बंद पडलेल्या ट्रकला दुचाकीची धडक

एमपीसी न्यूज – रस्त्याच्या मधोमध बंद पडलेल्या ट्रकला दुचाकीची धडक बसली. यामध्ये दुचाकीचे मोठ्या प्रमाणत नुकसान झाले. ही घटना काळेवाडी फाटा ओव्हर ब्रिजवर काळेवाडी येथे शनिवारी (दि. 31) सकाळी दहा वाजता घडली.

नागेश सौदागर जाधव (वय 36, रा. आळंदी रोड, पुणे) यांनी याबाबत शनिवारी (दि. 31) वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार ट्रक (एम एच 12 / सी टी 4859) चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे सहकारी सौरभ प्रदीप घाटपांडे आणि उमाजी उद्धव चव्हाण हे दोघेजण त्यांच्या दुचाकीवरून (एम एच 14 / एच झेड 1767) डांगे चौकातून शिवाजीनगरकडे जात होते. काळेवाडी ओव्हर ब्रिजवर आरोपीने त्याचा बंद पडलेला ट्रक रस्त्याच्या मधोमध लावला होता.

कोणत्याही प्रकारचे इंडिकेटर, रिफ्लेक्टर चिन्ह तसेच बंद पडलेल्या ट्रकची माहिती देण्यासाठी माणूस न ठेवता आरोपी ट्रक सोडून निघून गेला. त्या ट्रकला सौरभ यांची दुचाकी धडकली. यामध्ये दुचाकीचे मोठ्या प्रमाणत नुकसान झाले. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.