Wakad Crime : बांधकाम साईटवर तिसऱ्या माजल्यावरून पडल्याने कामगाराचा मृत्यू; दोघांवर गुन्हा

एमपीसी न्यूज – बांधकाम साईटवर काम करताना तिसऱ्या मजल्यावरील पाड्यावरून पडून बांधकाम कामगाराचा मृत्यू झाला. कोणतीही सुरक्षिततेची साधने न पुरविता कामगाराच्या मृत्यूस जबाबदार असणाऱ्या ठेकेदार व बांधकाम मालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 7 नोव्हेंबर रोजी थेरगाव येथे घडली.

सुरेश भिमा म्हस्के (वय 36) असे बांधकाम साइटवरून पडून मृत्यमुखी पडलेल्या कामगाराचे नाव आहे. ठेकेदार गणेश गुंडागळ (पूर्ण नाव आणि पत्ता माहिती नाही) आणि बांधकाम मालक लक्ष्मण सिताराम कुदळे (रा. गणेशनगर, थेरगाव) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. पल्लवी सुरेश म्हस्के (वय 33, रा. भगवान नगर, भूमकर चौक, वाकड) यांनी बुधवारी (दि. 11) याबाबत वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे पती आरोपी ठेकेदार गणेश गुंडागळ आणि बांधकाम मालक लक्ष्मण कुदळे यांच्याकडे काम करीत होते. त्या दोघांनी कामगारांच्या सुरक्षिततेसाठी हेल्मेट दिले नाही. तसेच सुरक्षा जाळीही बांधली नाही. यामुळे 7 नोव्हेंबर रोजी सकाळी साडेदहा वाजताच्या सुमारास बांधकाम साइटवरून पडल्याने कामगार सुरेश म्हस्के यांचा मृत्यू झाला. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.