Wakad Crime : पैसे देण्यास नकार दिल्याने तरुणावर कोयत्याने वार; दोघांना अटक

एमपीसी न्यूज – पैसे देण्यास नकार दिल्याने दोघांनी एका तरुणावर कोयत्याने वार केले. ही घटना मंगळवारी (दि. 3) रात्री सव्वा दहा वाजता रहाटणी रोड, नखातेवस्ती येथे घडली. पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली आहे.

प्रवीण बालाजी संगमे (वय 19), पवन विष्णू गायकवाड (वय 21, दोघे रा. रहाटणी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. कृष्णा बापू गोयेकर (वय 25, रा. रहाटणी) असे जखमी तरुणाचे नाव आहे. याबाबत त्यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी मंगळवारी रात्री सव्वादहा वाजता फिर्यादी कृष्णा यांना पैसे मागितले. कृष्णा यांनी पैसे देण्यास नकार दिला. त्यावरून आरोपींनी कृष्णा यांच्या डोक्यात कोयत्याने मारले. यामध्ये कृष्णा गंभीर जखमी झाले. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.