BNR-HDR-TOP-Mobile

Wakad : टेम्पो ट्रॅव्हलरच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

PST-BNR-FTR-ALL

एमपीसी न्यूज – टेम्पो ट्रॅव्हलर आणि दुचाकीचा अपघात झाला. या अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. हा अपघात डांगे चौक येथे गुरुवारी दुपारी झाला.

सिद्धार्थ सुदाम सावंत (वय 40, रा. टाकळी, जि. परभणी) असे अपघातात ठार झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे.

  • पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सावंत हे डांगे चौक ते भूमकर चौक या दरम्यान दुचाकीवरून जात होते. त्यावेळी भरधाव वेगात आलेल्या टेम्पो ट्रॅव्हलरने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.

या अपघातात सावंत यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच वाकड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. वाकड पोलीस याचा अधिक तपास करीत आहेत.

.

HB_POST_END_FTR-A1
.