BNR-HDR-TOP-Mobile

Wakad : बांधकाम साईटवर दहाव्या मजल्यावरून पडल्याने कामगाराचा मृत्यू; ठेकेदारावर गुन्हा

PST-BNR-FTR-ALL

एमपीसी न्यूज – बांधकाम साईटवर काम करताना दहाव्या मजल्यावरून पडल्याने कामगाराचा मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी (दि. 16) सकाळी दहाच्या सुमारास काळेवाडी येथे घडली. याप्रकरणी कामगारांना सुरक्षेची साधने न पुरवल्याबाबत ठेकेदार विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दिनेश कुशवाह (वय 33, रा. थेरगाव) असे गुन्हा दाखल झालेल्या ठेकेदाराचे नाव आहे. तर, शहाबन अली सय्यदअली (वय 19, रा. काळेवाडी) असे मृत्यू झालेल्या कामगाराचे नाव आहे.

  • याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जे एन बिल्डर यांची विजयनगर काळेवाडी येथे आदी अम्मा ब्लीस बांधकाम साईट सुरू आहे. या साईटवर काम करणाऱ्या कामगारांना सुरक्षेची पुरेशी साधने ठेकेदार दिनेश यांनी उपलब्ध करून दिली नाहीत.

गुरुवारी साईटवर काम करताना शहाबन दहाव्या मजल्यावरून पडला. यामध्ये त्याच्या डोक्याला, हाताला आणि पोटावर गंभीर दुखापत झाली. त्यातच त्याचा मृत्यू झाला. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाकड पोलीस अधिक तपास करीत आहेत.

HB_POST_END_FTR-A4
HB_POST_END_FTR-A1
.