Wakad : बांधकाम साईटवरील लोखंडी ट्रॉली पडल्याने कामगाराचा मृत्यू

एमपीसी न्यूज – बांधकाम साइटवर लोखंडी ट्रॉलीची वायर तुटल्याने ट्रॉली खाली पडली. यामध्ये एका कामगाराचा मृत्यू झाला. ही घटना बुधवारी (दि. 29) दुपारी छत्रपती चौक, कस्पटे वस्ती, वाकड येथे घडली.

दिलेराम शोभूराम यादव (वय 34) असे मृत्यू झालेल्या कामगाराचे नाव आहे. याप्रकरणी बांधकाम व्यावसायिक, कॉन्ट्रॅक्टर आणि सुपरवायझर यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. राजेश मोहनलाल निषाद (वय 27) यांनी वाकड पोलिसात तक्रार दिली.

  • याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, छत्रपती चौक वाकड येथील डायनॅस्टी सोसायटीजवळ एक बांधकाम साईट सुरू आहे. या साईटवरील लोखंडी ट्रॉलीची वायर तुटल्याने ट्रॉली खाली आदळली. यामध्ये दिलेराम यादव अडकले.

यादव या घटनेत गंभीर जखमी झाले. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. बांधकाम साइटवर संरक्षणाच्या दृष्टीने कोणती खबरदारी न घेता काम सुरू ठेवले. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाकड पोलिस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.