Wakad : कारखाली येऊन श्वानाचा मृत्यू , परस्परविरोधी गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – सोसायटीने पाळलेला कुत्रा सोसायटीच्या (Wakad) एका सभासदाच्या कारखाली येऊन मरण पावला. यातून झालल्या भांडणातून वाकड पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे. हा प्रकार कस्पटे वस्तीतील प्रिस्टीन ग्रँनडिअर सोसायटी येथे रविवारी (दि.28) घडला आहे.

याप्रकरणी पहिल्या तक्रारीत अंकित सुरेंद्र गुप्ता (वय 33 रा.कस्पटे वस्ती) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून महिलेवर प्राण्यांना क्रुरतेने वागवण्यास प्रतिबंध कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे.

या तक्रारीत म्हटले आहे की, शेरू या कुत्र्याला सोसायटी ने पाळले होते. तो सोसायटीच्या गेटच्या जवळ रस्त्यावर झोपला होता. यावेळी सोसायटीत राहणाऱ्या आरोपी महिलेने  कार  बेदरकारपणे चालवून शेरूच्या अंगावर घातली. यावेळी सोसायटीच्या वॉचमनने अडविण्याचा प्रयत्न केला असता आरोपी महिला तशीच निघून गेली व यात शेरूचा मृत्यू झाला.

Dighi : साखरपुड्यानंतर लग्नाला नकार देत, तरुणीवर लैंगिक अत्याचार

तर या विरोधात संबंधीत महिलेने परस्परविरोधी तक्रार दिली असून त्यानुसार, अंकित गुप्ता व दोन महिला विरोधात गुन्हा दाखल केला आहे. या तक्रारीत म्हटले आहे की, फिर्यादी यांच्या गाडी खाली आल्याने शेरूचा मृत्यू झाला.

याचे सीसीटीव्ही फुटेज फिर्यादी पहात असताना आरोपींनी तिला तुला गाडी खाली कुत्रा आला तरी कसे कळले नाही, दारु पिऊन गाडी चालवत होतीस का म्हणत ढकलले. तसेच पोलीस ठाण्यात गाडी घेण्यास सांगत शाविगाळ केली. यावरून वाकड पोलीस ठाण्यात परस्पत विरोधी गुन्हे दाखल केले आहेत ज्याचा वाकड पोलीस पुढील तपास करत ( Wakad ) आहेत.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.