Wakad : कारच्या धडकेत तरूणाचा मृत्यू; अज्ञात कारचालकाविरोधात गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – भरधाव वेगात आलेल्या कारने दुचाकीला धडक दिली. यामध्ये दुचाकीवर मागे बसलेल्या तरुणाचा मृत्यू झाला. हा अपघात शनिवारी (दि. 29) रात्री साडेदहाच्या सुमारास देहूरोड-कात्रज बाह्यवळण मार्गावर वाकड येथे घडली.

अदनान अब्दुल खान (वय 26, रा. ताथवडे) यांनी याप्रकरणी वाकड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात कारचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • पोलिसांनी दिलेल्या माहिनुसार, अदनान त्यांच्या दुचाकीवरुन मित्रासोबत जात होते. देहूरोड-कात्रज बाह्यवळण मार्गावर सुर्या हाॅस्पिटल समोर आले असता मागच्या बाजूने भरधाव वेगात आलेल्या कारने त्यांच्या दुचाकीला धडक दिली.

या अपघातात अदनान यांना किरकोळ दुखापत झाली. तर त्यांच्या मागे बसलेल्या मित्राला गंभीर दुखापत झाली. त्यात त्याचा मृत्यू झाला. कारचालक अपघाताच्या ठिकाणी न थांबता कारचालक पळून गेला. वाकड पोलिस अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.