Wakad : घरासमोर बॅडमिंटन खेळण्यावरून वाद; परस्परविरोधी गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – घरासमोर बॅडमिंटन खेळण्यावरून वाद झाला. याप्रकरणी परस्परविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ही घटना थेरगावमधील समर्थ कॉलनी येथे गुरुवारी (दि. 16) रात्री साडेआठच्या सुमारास घडली.

याप्रकरणी 36 वर्षीय महिलेने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार एका तरुणीसह तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी तरुणी रस्त्यावर बॅडमिंटन खेळत होती. त्यामुळे फिर्यादी महिलेच्या पतीने आरोपी तरुणीला ‘देशात लॉकडाऊन सुरू आहे. तू रस्त्यावर बॅडमिंटन खेळू नको’ असे म्हटले. यावरून आरोपी तरुणी आणि तिच्या घरच्यांनी मिळून फिर्यादी यांना शिवीगाळ करत मारहाण केली. तसेच फिर्यादी महिलेशी गैरवर्तन करत विनयभंग केला.

_MPC_DIR_MPU_II

याच्या परस्पर विरोधात 22 वर्षीय तरुणीने फिर्याद दिली आहे. त्यानुसार पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुणी गुरूवारी रात्री घराबाहेर बॅडमिंटन खेळत होती. त्यावेळी आरोपी याने तिला ‘तू घरात जा नाहीतर तुझ्या कानाखाली मारेल’, अशी धमकी दिली.

फिर्यादीने याचा जाब विचारल्यानंतर इतर आरोपींनी तिला शिवीगाळ करत जिवे मारण्याची धमकी दिली. तसेच तिचा विनयभंग केला. वरील दोन्ही गुन्ह्यांचा तपास सहायक पोलीस निरीक्षक सपना देवतळे करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_POSTEND_MAT_1