Wakad: भाजी, दुधासाठी पैसे मागितले म्हणून पतीने पत्नीला दिले गरम तव्याचे चटके

एमपीसी न्यूज – भाजीपाला आणि दूध आणण्यासाठी पैसे मागितल्यामुळे चिडलेल्या पतीने पत्नीला गॅसवरील गरम तव्याचे चटके दिले. तसेच डोके जमिनीवर आपटले. ही घटना शुक्रवारी (दि.8)सकाळी दहाच्या सुमारास थेरगाव येथे घडली.

याप्रकरणी पती मंगेश दत्ताराम दाभोळकर (वय 35, रा. कैलासनगर, थेरगाव) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत मंगेशची पत्नी मनाली दाभोळकर (वय 30)हिने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

मनाली यांनी शुक्रवारी आपले पती मंगेश यांच्याकडे भाजीपाला आणि दूध आणण्यासाठी पैसे मागितले. यामुळे चिडलेल्या मंगशे याने गॅसवरील गरम तव्याने मनाली यांना चटके दिले. तसेच डोके जमिनीवर आपटून जखमी केले. वाकड ठाण्याचे पोलीस हवालदार आर. जी. टिळेकर तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.