HB_TOPHP_A_

Wakad : माहेरहून कार आणण्याची मागणी करत विवाहितेचा छळ

0 113

एमपीसी न्यूज – माहेरहून कार, पैसे आणि इतर सामान आणण्याची मागणी करत सासरच्या मंडळींनी विवाहितेचा छळ केला. घरातून तिला आणि तिच्या मुलाला बाहेर काढले. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

HB_POST_INPOST_R_A

पती समीर गोयल (वय 33), सासरे सुरेंद्रकुमार गोयल (वय 60), सासू रमन गोयल (वय 57, सर्व रा. वाकड) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी 29 वर्षीय विवाहितेने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादी महिलेकडे माहेरहून चारचाकी गाडी, रोख पैसे आणि इतर सामान आणण्याची मागणी केली. त्यास विवाहितेने नकार दिल्याने तिला मारहाण व शिवीगाळ केली. तिच्या मुलाला जीवे मारण्याची धमकी देत फिर्यादी महिला आणि तिच्या मुलाला घराबाहेर काढले. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

HB_POST_END_FTR-A4
HB_POST_END_FTR-A1

%d bloggers like this: