Wakad : लग्नात दुचाकी न दिल्यावरून विवाहितेचा छळ

एमपीसी न्यूज – लग्नात अंगावर दागिने घातले नाहीत तसेच दुचाकी दिली नाही या कारणावरून विवाहितेचा छळ केला.

शीतल शिंदे (वय 27) यांनी याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पती राजेंद्र शिंदे (वय 32, रा.ज्योतीबानगर, काळेवाडी) तसेच सासू, नणंद, दोन दीर व दोन जाऊ या सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शीतल व राजेंद्र यांचे 2013 साली लग्न झाले. मात्र लग्नात शीतल यांच्या आई-वडिलांनी शीतल यांना सोने दिले नाही. तसेच आरोपींनी शीतल यांच्या माहेरच्या मंडळींकडे दुचाकीची मागणी केली. ती दुचाकी दिली नाही यावरून शीतल यांना शिवीगाळ तसेच मारहाण केली जात होती. घराण्याला वंशाला दिवा दिला नाही तर तुला नांदवणार नाही, असे म्हणत शीतल यांचा मानसिक छळ करण्यात आला. त्यामुळे पिडीतेने थेट पोलीस ठाणे गाठत पतीसह सासरच्या मंडळींविरुद्ध गुन्हा नोंदवला. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.