Wakad : विवाहितेच्या छळ प्रकरणी पतीसह दहा जणांवर गुन्हा

एमपीसी न्यूज – माहेरहून पैसे आणण्याची मागणी करत विवाहितेचा गर्भपात केला. याप्रकरणी विवाहितेच्या पतीसह दहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पती महम्मद शब्बीर बागमारू (वय 26, रा. गवंडी गल्ली, ता. उदगीर, जि. लातूर) आणि अन्य नऊ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी 25 वर्षीय विवाहितेने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी आपसात संगनमत करून विवाहितेकडे वारंवार वेगवेगळ्या कारणांवरून माहेरहून पाच लाख रुपये आणण्याची मागणी केली. पैसे न आणल्यास दोन खोल्या नावावर करून देण्यास सांगितले. विवाहितेचा गर्भपात होण्यासाठी तिला उपाशी ठेऊन, जड सामान उचलण्यास सांगून तसेच गोळ्या खायला देऊन गर्भपात केला. विवाहितेला शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण करून त्यांचा मानसिक व शारीरिक छळ केला. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून वाकड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.